बदललेल्या दिवसांची जाणीव
२ - ३ दिवसांपूर्वी ओजस ने बोलता बोलता त्याच्या १० मित्रांची नावे मोजली आणि शेवटी एकदम उत्साहात म्हणाला "बाबा, आता आमची क्रिकेट टीम होऊ शकते."
मी: अरे पण क्रिकेट च्या टीम मध्ये तर ११ जणं असतात. तुम्हाला एक कमी पडतोय तर मग मी येऊ का तुमच्या टीम मध्ये?
तो: (बराच विचार करून जाणीवपूर्वक काहीच उत्तर नाही... आणि विषय बदलायचा प्रयत्न देखील)
मी: काय झालं? सांग ना मी येऊ का तुमच्या टीममध्ये. आपण मस्त सगळ्या मॅचेस् जिंकू नं..
तो: (आता बळजबरी उत्तर द्यावच लागत आहे या अविर्भावात पण शांतपणे) नको..
मी: का? मला तर चांगलं खेळता येतं नं.
तो: (अगदी ठामपणे) पण नाही, बाबा. ही टीम (त्याच्या कल्पनेतली) फक्त मुलांची आहे.
#बदललेल्या_दिवसांची_जाणीव (best friend to father)
Labels: असंच एकदा

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home